Navratri Colours 2023: (Shardiya Navratri 2023) नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या (Durga Mata) प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्व आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये नऊ रंगाना विशेष महत्व आहेत. या वर्षी शरद नवरात्रि 15 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे, कोणत्या दिवशी कोणता रंग आणि त्याचे महत्व जाणून घेऊया.
संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्री 2023 मध्ये नऊ रंग कोणते?
प्रतिपदा पहिला दिवस – 15 ऑक्टोबर – नारंगी
द्वितीया दुसरा दिवस – 16 ऑक्टोबर- पांढरा
तृतीया तिसरा दिवस – 17 ऑक्टोबर- लाल
चतुर्थी चौथा दिवस – 18 ऑक्टोबर – रॉयल ब्लू
पंचमी पाचवा दिवस – 19 ऑक्टोबर – पिवळा
षष्ठी सहावा दिवस – 20 ऑक्टोबर – हिरवा
सप्तमी सातवा दिवस – 21 ऑक्टोबर – राखाडी
अष्टमी आठवा दिवस – 22 ऑक्टोबर – जांभळा
नवमी नववा दिवस – 23 ऑक्टोबर – मोरपिसी